OBS Studio काय आहे आणि ते काय काम करते ?


OBS Studio काय आहे आणि ते काय काम करते ?

ओपन ब्रॉडकास्टर सॉफ्टवेअरची सुरुवात ह्यूग "जिम" बेलीने (Hugh "Jim" Bailey)  तयार केलेल्या एका लहान प्रकल्पाच्या (Project) रूपात झाली, परंतु ओबीएस सुधारण्यासाठी आणि प्रोग्रामबद्दल ज्ञान प्रसारित करण्यासाठी कार्यरत असलेल्या अनेक ऑनलाइन सहकार्यांच्या मदतीने द्रुतगतीने वाढ झाली. 

2014 मध्ये OBS मल्टी-प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाऊ लागले कारण ते सगळ्या प्लॅटफॉर्म ला support करत होते, पुढे 2016 मध्ये याची ओबीएस स्टुडिओ म्हणून ओळख निर्माण झाली.

Open Broadcaster Software (live streaming software)

ओबीएस स्टुडिओ (OBS Studio ) स्क्रीन रेकॉर्डिंग आणि थेट प्रवाहासाठी  (live streaming) साठी वापरले जाणारे एक Free and Open-Source Software सॉफ्टवेअर संच आहे. याचा कोडे C,C++ आणि Qt मध्ये लिहिलेला आहे. ओबीएस Real-time source आणि device capture, scene composition, encoding, recording, आणि broadcasting वापरल्या जाते.

डेटाचे Transmission प्रामुख्याने रीअल टाईम मेसेजिंग प्रोटोकॉल (RTMP) द्वारे केले जाते आणि YouTube, Twitch, Instagram and Facebook सारख्या स्ट्रीमिंग वेबसाइटच्या अनेक प्रीसेटसह कोणत्याही आरटीएमपी ला support करते.

याला अश्या प्रकारे Design केले आहे की त्या मध्ये तुम्ही एकाच वेळी वेगवेगळी कार्य करून तिचे थेट प्रेक्षपण करू शकता.

जसे की तुम्ही यामध्ये आवाज रेकॉर्ड करू शकता वेब कॅमेरा ने स्वतःचा विडियो रेकॉर्ड करू शकता आणि तुमच्या computer ची स्क्रीन देखील रेकॉर्ड करू शकता आणि हे सगळ तुम्ही live दाखवू शकता. 

OBS Studio ला कोण कोणत्या operating system support करतात ?

OBS Studio ला Windows, Mac, Linux या सर्व ऑपरेटिंग सिस्टिम सपोर्ट करतात. 

OBS Studio कुठून download करावे ?

https://obsproject.com/ या वेबसाइट वरुण अगदी मोफत तुम्ही download करू शकता. ओबीएस स्टुडिओ एक विश्वासार्ह मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर आहे जे विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते.

OBS Studio चे Features काय आहेत  ?

उच्च कार्यप्रदर्शन  real time video/audio capturing आणि मिक्सिंग. विंडो कॅप्चर, प्रतिमा, मजकूर, ब्राउझर विंडोज, वेबकॅम, कॅप्चर कार्ड आणि बरेच काही यासह एकाधिक स्त्रोतांनी बनविलेले देखावे तयार करता येतात.

Intuitive audio mixer

Multiple video sources filters

Powerful configuration option

Streamlined settings panel

Multiple themes

Real-time audio/video capturing and mixing

OBS Studio ची किंमत किती आहे?

OBS Studio हे open-source software असल्यामुळे यासाठी कुठलीही किंमत मोजावी लागत नाही. तुम्ही हे free मध्ये डाऊनलोड करून वापरू शकता आणि विशेष म्हणजे या मध्ये watermark येत नाही.

OBS Studio कसे वापरावे?

1] सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरून ओबीएस सॉफ्टवेअर विनामूल्य डाउनलोड करा.

2] Install केल्यानंतर उघडा.

3] Source मध्ये आपल्याला पर्याय स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी (+) चिन्ह निवडावे लागेल.

4] रेकॉर्डिंगचा पर्याय निवडा. Audio input capture, Display Capture आपण इच्छित असलेले option आपण निवडू शकता.

5] आता आपण स्क्रीन रेकॉर्ड Source आणि resolution ठराव निवडा. फाइल -> सेटिंग -> आउटपुट

6] आता स्टार्ट स्क्रीन रेकॉर्ड पर्यायावर क्लिक करा, स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होईल.

OBS Studio कोणी वापरावे?

सध्या कोरोना वायरस मुळे सगळे शाळा, कॉलेज बंद आहेत आणि आता ऑनलाइन क्लास घेण्यात येत आहे, त्यासाठी शिक्षकांसाठी खूप उपयोगी असे हे सॉफ्टवेअर आहे.

Youtubers साठी ज्यांना ऑनलाइन questions-answers विचाराचे आहेत व live screen वापरुन दाखवायची आहे.

Businessman साठी ज्यांना ऑनलाइन presentations द्यायचे आहे.

Gamers ज्यांना ऑनलाइन game खेळून Youtube वर Live दाखवायचा आहे.

यामध्ये computer screen रेकॉर्ड करता येते. live streaming करता येते.

-    

OBS Studio चे फायदे:

-        Graphics card ची गरज नाही.

-        फ्री सॉफ्टवेअर आहे.

-        वापरायला खूपच सोपे आहे.

OBS Studio चे तोटे:

-          यामध्ये Video Edit करता येत नाही.

-         Windows XP वर कार्य करत नाही.

तुम्ही काय शिकले ?

मला खात्री आहे की OBS Studio काय आहे आणि ते काय काम करते ?

या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल, तुम्हाला अजून कोणती अश्या प्रकारची software’s आहेत या बद्दल माहिती हवी असल्यास मला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या