Paython Language काय आहे? आणि आपण Paython का शिकायला पाहिजे?
तुम्ही जेव्हा Paython हे नाव ऐकलं असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की
Paython म्हणजे एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटातला मोठा साप तर
नाही ना ? तर मित्रांनो असं काहीही
नाहीये.
ही एक लोकप्रिय आणि सोपी
प्रोग्रामिंग लॅंगवेज आहे. एक उच्च-स्तरीय भाषा आहे आणि ही जटिल कार्ये(complex task) करू शकते विशेष म्हणजे open
source आहे.
तुम्हाला जर programming मध्ये करियर करायचे असल्यास हा लेख पूर्ण वाचा कारण या लेखामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
Paython Language काय आहे? आणि आपण Paython का शिकायला पाहिजे?
तर या लेखामध्ये आपण पुढीलप्रमाणे हे मुद्दे जाणून घेनार आहोत
- Python चा इतिहास - History of Python in Marathi),
- Paython काय आहे? what is paython in marathi?
- Paython Language चा वापर कुठे केला जातो? Use of Python in Marathi
- Python Language चे वैशिष्ट्य काय आहे? Features of Python in Marathi
- Paython Language कोण वापरतो ?
- Paython Language चे फायदे काय आहे ?
- Paython Language चे तोटे \ कमतरता काय आहेत?
Python
चा इतिहास- History of Python in Marathi
1980 च्या दशकात पायथनची पायाभरणी झाली. त्याची अंमलबजावणी 1989 मध्ये नेदरलँडच्या
सीडब्ल्यूआय(CWI) येथे Guido Van Rossum ने सुरू केली होती.
फेब्रुवारी 1991 मध्ये van Rossum ने Version 0.9.0 alt sources मध्ये आपली पहिली आवृत्ती
सार्वजनिकपणे लाँच केली.
1994 मध्ये पायथन 1.0 ला सादर केले गेले ज्यात lambda, map, filter आणि reduce सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश होता.
यानंतर, त्याच्या बर्याच Versions येत राहिल्या आणि नवीन नवीन वैशिष्ट्ये जोडली गेली. सध्या पायथन 3.8.5 ही त्याची नवीनतम आवृत्ती आहे जी 20 जुलै 2020 रोजी लाँच झाली.
Paython Language काय आहे? what is paython in marathi?
Paython एक जनरल पर्पज आणि हाय लेवल
प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे. या Paython लैंग्वेजचा उपयोग सॉफ्टवेअर, ॲप्स, डेटा सायन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग इत्यादी क्षेत्रात केला जातो.
Python एक Interpreted, Interactive तथा Object
Oriented Programming Language आहे.
पायथन पोर्टेबल आणि Platform independent आहे.
हे विंडोज, मॅक किंवा लिनक्स सारख्या कोणत्याही
प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते.
Python जरनल पब्लिक लाइसेंस म्हणजे GPL च्या अन्तर्ग उपलब्ध आहे.
हे पूर्णपणे विनामूल्य
आणि मुक्त स्त्रोत open source आहे.
हे download करण्यासाठी तुम्ही https://www.python.org/ या संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
Paython Language चा वापर कुठे केला जातो? Use of Python in Marathi
पायथन जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात वापरला जातो. Software Development, Web App Development, Artificial Intelligence,
Machine Learning, Deep Learning, Data Science तथा Ethical Hacking इत्यादि ठिकाणी.
पायथनचा वापर गेम डेव्हलपमेंटसाठी देखील केला जातो. पायथॉनची लोकप्रिय फ्रेमवर्क, Django वेब प्रोग्रामिंगमध्ये वापरली जाते.
Python Language चे वैशिष्ट्य काय आहे? Features of Python in Marathi
Free व Open Source: Python एक open source programming Language आहे. पायथन त्याच्या अधिकृत वेबसाइटवरून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. याचा Source Code पण तुम्हाला Github वरून घेता येतो.
Object Oriented: Python C++ आणि जावा (Java) ही Object Oriented Programming Language आहे. हे Classes, Encapsulation, Inheritance आणि इतर Object Oriented वैशिष्ट्यांचे Support करते.
Embeddable: हे अन्य भाषांमध्ये देखील वापरले जाऊ शकते. हे सी,सी प्लस प्लस (C,C++) आणि जावा सारख्या अन्य भाषांमध्ये एम्बेड (Embeddable) केले जाऊ शकते.
Large Standard Library: पायथनमध्ये आधीपासून तयार केलेली मॉड्यूल्स (Modules) आणि फंक्शन्सची (Functions) खूप मोठी लायब्ररी आहे.
Cross-platform: मी आधी सांगितल्याप्रमाणे पायथन एक पोर्टेबल भाषा आहे. हे कोणत्याही विंडोज, मॅक आणि लिनक्सवर वापरले जाऊ शकते.
Simple and easy Syntax: पायथनचा सिन्टाक्स इतर प्रोग्रामिंग भाषांपेक्षा सोपी आहे. हे शिकणे आणि वापरणे सुलभ करते.
Paython Language कोण वापरतो ?
अनेक संस्था, कंपन्या Python Language चा वापर करतात. पायथन-वापर करणार्या काही Popular मोठ्या कंपन्या यामध्ये
समाविष्ट आहेत:
- Goggle
- Qoura
- Netflix
- Dropbox
- Spotify
Paython Language चे फायदे काय आहे?
- नवशिक्या भाषा (Beginner's Language)
- सोपे आणि शिकण्यास सुलभ (Simple and Easy to Learn)
- दुभाषित भाषा (Interpreted Language)
- क्रॉस-प्लॅटफॉर्म भाषा (Cross-platform language)
- मोफत आणि मुक्त स्त्रोत (Free and Open Source)
- ऑब्जेक्ट-ओरिएंटेड भाषा (Object-Oriented language)
- विस्तृत ग्रंथालये (Extensive Libraries)
- समाकलित (Integrated)
- डेटाबेस कनेक्टिव्हिटी (Databases Connectivity)
Paython Language चे तोटे \ कमतरता काय आहेत?
गती (speed)
पायथन सी किंवा सी प्लस प्लस (C,C++) पेक्षा हळू आहे. परंतु नक्कीच, पायथन ही उच्च-स्तरीय भाषा आहे, सी किंवा सीपेक्षा ती हार्डवेअरच्या जवळ नाही.
मोबाइल विकास (Mobile Development)
Mobile Development साठी पायथन ही फार चांगली भाषा नाही. मोबाइल संगणनासाठी ती एक कमकुवत भाषा म्हणून पाहिले जाते. हेच कारण आहे की त्यात (Carbonnelle) कार्बनेलसारखे बरेच मोबाइल अनुप्रयोग तयार केले गेले आहेत.
मेमरी वापर (Memory Consumption)
Memory intensive कामांसाठी पायथन एक चांगला पर्याय नाही. डेटा-प्रकारांच्या flexibility मुळे पायथनचा मेमरी वापर देखील जास्त आहे.
डेटाबेस प्रवेश (Database Access)
पायथनला डेटाबेस प्रवेशासह मर्यादा आहेत. JDBC and ODBC सारख्या लोकप्रिय तंत्रज्ञानाच्या तुलनेत पायथनचा Database Acces स्तर थोडा अविकसित आणि primitive आढळला. तथापि, complex legacy data सहज interaction आवश्यक आहे अशा उद्योगांमध्ये ते लागू केले जाऊ शकत नाही.
रनटाइम त्रुटी (Runtime Errors)
पायथन प्रोग्रामरने भाषेच्या रचनेसह अनेक समस्या उद्धृत केल्या. भाषा गतिकरित्या टाइप केली गेल्याने, त्यास अधिक चाचणी आवश्यक आहे आणि त्यामध्ये त्रुटी आहेत ज्या केवळ रनटाइम वर दर्शविल्या जात आहेत.
तर Paython Language काय आहे? आणि आपण Paython का शिकायला पाहिजे? या पायथॉन वरील लेखाबद्दल आपल्याला काही suggestions किंवा कल्पना द्यावयाच्या असतील
तर नक्कीच comments करून सांगा.
0 टिप्पण्या