Affiliate मार्केटिंग म्हणजे काय व त्याद्वारे पैसे कसे कमवतात ?
Affiliate म्हजणे सलग्न होणे एखाद्या मोठ्या Company शी सलग्न होणे. व त्यांच्यासाठी मार्केटिंग करणे. आजचे युग हे इंटरनेट चे युग म्हणून ओळखले जाते. आणि आता तर Lockdown मुळे ऑनलाइन शॉपिंग आणि मार्केटिंग खूप होत आहे.
त्यामुळे खूप सारा व्यापारी वर्ग आपला धंदा,व्यापार,बिसिनेस ऑनलाइन नेत आहेत आणि करत आहे. बरेच असे लोक आहेत जे यूट्यूब, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया चा वापर करून आणि ओळखीचा व प्रसिद्धीचा वापर करून त्यांना ऑनलाइन ग्राहक मिळून देतात आणि त्या मोबदल्यात काही कमिशन (पैसे) कमवतात.
जर तुम्ही फक्त ऐकून
असाल affiliate Marketing किंवा तुम्ही ब्लॉगर
असाल तुमची वेबसाइट असेल किंवा सोशल मीडिया वर तुमचे खूप फोलोवर्स असतील तर चला मग
हा लेख तुमच्यासाठी आहे सविस्तर जाणून घेऊया affiliate Marketing बद्दल.
Affiliate मार्केटिंग
म्हणजे काय ? - What is affiliate marketing in Marathi ?
समजा तुमची एखादी website किंवा एखादा blog आहे त्यावर तुम्ही विविध company ची जाहिरात करून पैसे कमवू शकता. ते पैसे तुम्हाला commission च्या स्वरुपात मिळतात. कमिशन किती मिळते हे ठरत तुम्ही कोणता product विकतात.
जसे की electronics वर commission
खूप कमी असते कारण इलेक्ट्रॉनिक्स वस्तु जस की mobiles घेणार्यांची संख्या जास्त आहे. Fashion, beauty products, jewellery kids toys इ. वस्तू वर commission जास्त मिळते.
कोणतीही जाहिरात (advertisement)
करण्यापूर्वी तुमच्या website किंवा blog वर तेवढा traffic पाहिजे. जेवढे जास्त visitors
तेवढी तुमची कमाई. म्हणून जेव्हा तुमच्या website किंवा blog चे visitors वाढतील
तेव्हाच तुम्ही affiliate marketing ला सुरवात करा.
Affiliate मार्केटिंग कसे काम करते ?
जर तुम्ही ऑनलाइन
जास्त सक्रिय असाल तर तुम्हाला ही एक चांगली संधी आहे, affiliate marketing करून पैसे कमावण्याची.
एखादी product
based company किंवा organization ज्यांना
त्यांच्या products चा sale वाढवायचा
आहे त्यांना पहिले त्यांचे products हे promote करावे लागतात म्हणून ते affiliate program सुरू करतात.
Affiliate मार्केटिंग
चा business हा commission वर अवलंबून
असतो जेव्हा कोणी blogger किंवा ज्याची website असेल असा व्यक्ति Affiliate program join करतो, तेव्हा त्याला एक विशिष्ट प्रकारची link
मिळते. ती लिंक त्याला blog किंवा website वर अश्या प्रकारे लावावी लागते की जो कोणी visitors येईल त्याला ती दिसावी मग ती एखादी ऑफर असू शकते. त्या वर क्लिक करून तो visitor
त्या company च्या website वर जाईल व registration करेल किंवा खरेदी करेल व
त्या बदल्यात त्या ब्लॉगर किंवा वेबसाइट च्या मालकाला commission मिळेल.
Affiliate मार्केटिंग द्वारे पैसे कसे कमवतात ?
Affiliate मार्केटिंग
चा वापर करून पैसे कमावणे खूप सोपे झाले. मी तुम्हाला काही Idea देतो. जसे की जर तुम्ही फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम वर असाल तर तुम्ही नव
नवीन products चे photos पोस्ट करून त्याला
affiliate link देऊ शकता म्हणजे ज्यांना ती वस्तु घ्यावयाची असेल
ते तुमची link वापरुन त्या websites वरून
खरेदी करतील म्हणजे तुम्हाला commission मिळेल.
जर तुम्ही Youtuber
असला तर तुम्ही नवीन products बद्दल review
करू शकता म्हणजे लोकांना पटवून देऊ शकता त्या products चे फायदे तोटे आणि Youtube च्या description मध्ये लिंक देऊ शकता म्हणजे लोक तुमच्या affiliate link द्वारे खरेदी करतील व तुम्हाला पैसे मिळतील.
जर तुमची website
किंवा blog असेल तर तुम्ही तुमच्या website
वर लिखाण करून त्या products ची माहिती देऊ शकता
व ज्यांना घ्यावायचे असतील प्रोडक्टस ते तुमच्या लिंक वरून खरेदी करतील.
Affiliate Program कडून पैसे कसे मिळतात?
हे वेगवेगळ्या Affiliate Program वर अवलंबून असते ते कुठल्या payment methods ला support करतात. परंतु जवळजवळ सर्व प्रोग्राम्स पेमेंटसाठी बँक ट्रान्सफर आणि Paypal चा वापर करतात. Affiliate Program च्या काही नियम व अटी असतात त्या नुसार ते promotion करणार्याला किती पैसे द्यायचे ते ठरवतात. जसे की,
CPM (Cost Per 1000 impressions): जर लिंक वर 1000 क्लिक असतील तर company त्याच्या आधारावर commission देतो.
CPS (Cost Per Sale): जेव्हा ब्लॉगवरुन visitors product खरेदी करतात. तेव्हा जेवढे product विक्री तेवढी रक्कम मिळते.
CPC (Cost per click): त्याला जाहिराती, मजकूर, ब्लॉगवरील बॅनरवरील प्रत्येक क्लिकवर कमिशन मिळते.
Affiliate मार्केटिंग साइट्समध्ये कसे join व्हावे?
Affiliate program join करणे खूप सोपे आहे. ज्या कंपनी चा Affiliate program join करायचा आहे. त्यांच्या website वर जावे. Create Affiliate account करावे. मग Registration form भरावा. ज्या मध्ये तुम्हाला तुमची details द्यावी लागेल जसे की नाव,फोन नंबर, ईमेल आयडी, पत्ता इ. आर्थिक व्यवहार असल्यामुळे तुम्हाला pan card, bank account number ज्या मध्ये तुम्हाला commission पाहिजे असेल तो व तुमच्या website किंवा Blog चा URL जिथे तुम्ही त्या कंपनी च्या products च promotion करणार.
तुम्ही दिलेली माहिती पडताळून झाल्यानंतर तुम्हाला कंपनी कडून एक confirmation mail येईल. त्यानंतर तुम्हाला login करावं लागेल मग तुमच्या समोर एक dashboard असेल त्यावर तुम्हाला कंपनी चे products दिसतील त्याची लिंक कॉपी करून तुम्ही तुमच्या social media, website किंवा Blog वर share करू शकता.
लोकप्रिय Affiliate Program साइट कोण कोणत्या आहेत?
इंटरनेटवर बर्याच affiliate marketing कंपन्या उपलब्ध आहेत, परंतु आज मी तुम्हाला अशा काही लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट कंपन्यांबद्दल सांगेन ज्या तुम्हाला अधिक कमिशन देतात.
कोणत्याही affiliate प्रोग्रॅम मध्ये join होण्यापूर्वी त्या प्रोग्रामशी संबंधित सर्व माहिती तुम्हाला अगोदरच मिळाली पाहिजे. आपल्याला एखाद्या कंपनीच्या affiliate program प्रोग्रामबद्दल जाणून घेऊ इच्छित असल्यास आपल्याला कंपनीच्या नावासमोर Affiliate Program लिहून कोणत्याही search engine वर शोध घ्यावा आणि त्या कंपनीला affiliate program असेल तर तुम्ही तो join करू शकता.
Best Affiliate Marketing Sites:
1. Amazon Affiliate
2. Snapdeal Affiliate
3. Clickbank
4. Commision Junction
5. eBay
6. Godaddy
Affiliate Program मध्ये join होण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या.
जेव्हा आपल्याला नवीन Affiliate Program मध्ये जॉईन व्हायचे असेल किंवा एखाद्या Affiliate Network मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तेव्हा आपण काही गोष्टींची काळजी घ्यावी.
काही
Target आहे का?
Affiliate
control पॅनल आहे का नाही
किमान
पेमेंट किती आहे?
पेमेंट
पद्धत काय आहे?
Tax
form आवश्यक आहे की नाही?
हे
सर्व factors आपल्याला अगोदर माहित असणे चांगले
आहे कारण त्या वरून आपल्याला ठरवता येईल आपण या company चे promotion कारचे की नाही.
आपण काय शिकलो ?
आपण Affiliate
मार्केटिंग म्हणजे काय ? - What is affiliate marketing in Marathi? याबद्दल माहिती मिळवली, ज्याद्वारे
आपण खूप चांगले extra उत्पन्न मिळवू शकतो. आशा आहे की
आपल्याला हा लेख आवडला असेल. आपल्याला हा लेख कसा वाटला? कृपया
एखादी टिप्पणी लिहून आम्हाला सांगा जेणे करून आम्हालाही आपल्या विचारांमधून
काहीतरी शिकण्याची आणि सुधार करण्याची संधी मिळेल.
4 टिप्पण्या
छान माहिती मिळाली..
उत्तर द्याहटवासर तुम्ही खुप चांगली माहिती दिली पण मला प्राडक्टस विकत घ्यायचे असतील तर ते मी कसे घेऊ शकतो माझे Affilate assocites वरून pls सांगा
हटवाAffiliate marketing करणे म्हणजे products विकत घेण्याची अवशकता नाही. तुम्हाला दुसर्याचे products विकून द्यावयाचे आहे म्हणजे तुम्हाला commission मिळते. जर या उत्तराने समाधानी नसाल तर तुमचा प्रश्न सविस्तर लिहा.
हटवाखुप छान इन्फॉर्मेशन आहे
उत्तर द्याहटवा