Animation काय आहे व ते कसे बनवतात ?


चला तर मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती देतो की Animation काय आहे व ते कसे बनवतात ?

तुम्ही लहानपणी cartoon’s तर बघतच असाल TV वरती, ज्या मध्ये तुम्हाला colorful चित्र हलतांना, पळतांना व बोलतांना दिसले असतील तर ते आहे animation हे तर जवळपास सर्वांनाच माहीत आहे पण ते बनवतात कस?

जशी प्रगती technology, digitization, cinema advertisement या क्षेत्रात होत आहे तशीच प्रगती animation industries मध्ये पण होत आहे आणि बर्या्च क्षेत्रात animation चा सिंहाचा वाटा आहे. म्हणून आज काल animation मध्ये रोजगारच्या संधी वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील याकडे एक करियर ऑप्शन म्हणून बघत आहे.

तुम्ही या Animation च्या क्षेत्रात खूप प्रगती करू शकता आता film industries, adver-tisements, graphics designing, digital marketing, E-Learning E-Commerce या मध्ये प्रचंड Animators ची गरज आहे. पण त्यासाठी तुम्हाला लागेल knowledge आणि skills.

आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की, Animation काय आहे त्याचे प्रकार किती त्यात साधारण मुले मुली career बनवू शकतील की नाही, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील हा लेख शेवट पर्यंत वाचा.

 

Animation म्हणजे काय ? (What is Animation in Marathi)

खूप सार्याह images घेऊन त्याला एका speed मध्ये move करायच जेव्हा स्थिर असलेल्या images एकाच ठिकाणी एका sequence मध्ये दिसतात तेव्हा असा भास होतो की जस आपल्या डोळ्यांसमोर त्या हलत आहेत, एका video प्रमाणे त्यमधल्या वस्तु movement करतात की काय असा भास होतो.

आणि निर्जीव दिसणार्याm वस्तु मध्ये जीव आहे की काय असे illusion होते.

 

Animation चे प्रकार (Types of Animation in Marathi)

Animation  चे खूप प्रकार आहेत आणि बरेच प्रकार आता तर वापरत सुद्धा नाही म्हणून आपण काही महत्वाचे प्रकार बघूयात.

Traditional Animation

तुम्ही Tom n Jerry Cartoon बघितलं असणारच हे होत traditional type animation. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे चक्क पेपर वरती पेन्सिल ने ड्रॉइंग करून बनवले आहे. Background, Character Layouts सुद्धा Draw करून बनवले आहे. या मध्ये खूप मेहनत लागायची एक-एक Drawing हाताने काढायला लागायची पण आता computers आलेत आता हा प्रकार outdated झाला.

Stop Motion Animation

या प्रकारामध्ये objects एका जागी ठेवलेले असतात फोटो काढल्या जातात आणि नंतर पुन्हा ठेवल्या जातात. ही प्रक्रियाची शेकडो किंवा हजारो वेळा पुनरावृत्ती केली जाते. जेव्हा चित्रे वेगाने अनुक्रमे पाहिली जातात तेव्हा Objects हलताना दिसत आहे.

Motion Graphics

या प्रकारचे Animation इतर प्रकारच्या अॅवनिमेशनपेक्षा पूर्णपणे भिन्न असते मोशन ग्राफिक्स कोणत्याही Animation किंवा कोणत्याही डिजिटल फुटेजचे Pieces असतात या प्रकारचे अॅणनिमेशन इलेक्ट्रॉनिक मीडिया तंत्रज्ञानाद्वारे प्रदर्शित केले जातात. आणि बहुधा ते मल्टीमीडिया प्रकल्पांमध्ये ऑडिओसाठी वापरले जातात.

2D Animation

2D Animation म्हणजे 2 Dimensions जसे चित्र आपण TV वर पाहतो. 2D Anima-tion बनवण्यासाठी खूप सारे Software’s available आहेत जसे की Synfig Studio, Blender, Cinema4D, adobe Animate इत्यादी. हे सगळे Software’s तुम्ही तुमच्या Computer वर वापरू शकता. यामध्ये तुम्ही Drawings Scan करून पण टाकू शकता जेणे करून Directly तुम्ही त्या Character ला Movement देऊ शकता आणि सुंदर 2D Animation स्वतः बनवू शकता.

3D Animation

3D Animation म्हणजे 3 Dimensions हे थोडसं आपल्या डोळ्यांना Realistic वाटत आणि हे आपल्या खूप जवळ आहे की काय असा भास होतो. तुम्ही 3D Movies बघितलाच असेल Theatre ला चश्मा लावून. 3D Animation बनवण्यासाठी Blender, Maya, 3DS Max हे software’s available आहेत.

VFX

VFX  म्हणजे visual Effects एखाद्या movie मध्ये तुम्ही बघितले असतील ते special effects जे अश्या seen साठी वापरतात जो Real Life मध्ये Shoot करन शक्य नाही किंवा खूप महाग आहे. जसे की अंतराळत जाऊन Shooting घेणे.

तरी पण खूप Hollywood च्या Movies मध्ये तुम्ही बघितलं असेल परग्रही (Aliens) कसे पृथिवर आक्रमण करतात ते space मधून कसे फिरतात. किवा परदेशात जाऊन shoot केल्या पेक्षा इथेच दुसरा देश दाखवतात. तर हे सगळ शक्य आहे VFX च्या मदतीने, जो seen special दाखवायचा असतो त्यामागे Green किंवा Blue रंगाचा पडदा वापरतात त्याला Green Chroma असे म्हणतात. हे वापरुन seen च्या मागचे Background हटवल्या जाते व त्याला Computer वर Composition करून त्यात Special Effects वापरुन हव्या त्या गोष्टी add केल्या जातात आणि seen Original वाटतो.

 

Animation कसे बनवतात?

Animation बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लागेल एक छान Story आणि त्या Story साठी लिहावी लागेल Script ज्या मध्ये सर्व मुद्दे असतील. आता पुढे त्या Story मध्ये कुठले seen असतील याचा क्रम आणि तो seen कसा दाखवायचा, याचा एक आराखडा म्हणून आपल्याला लागेल एक Storyboard. जर तुम्हाला Storyboard माहीत नसेल तर सांगतो, तुम्ही कधी लहानपणी Comic Books वाचले असतील ना? त्यामध्ये दाखवलेले छोटे छोटे रकाने ज्या मध्ये आपल्याला सगळे seen बघायला मिळतात.

 Storyboard मुळे आपल्याला Story ची दिशा, प्रवाह कळतो म्हणजे आपला वेळ व पैसा दोन्ही वाचतो Storyboard खूप महत्वाचा भाग असतो animation मध्ये.

आता आपल्याला जे animations बनवायचे आहे ते 2D किंवा 3D या वरून आपण assets बनवतो. जर 3D बनवायचे असेल तर त्यासाठी character, models, props, environment sets तयार करावे लागते प्रत्येक Part ला movement द्यावी लागते.

आणखी बरेच फॅक्टर्स असतात Texturing, Lighting, Rendering हे सर्व झाल्यानंतर colour correction, Music, Sound Designing Final Editing. त्यानंतर तुमचं Animation ready.

 

Animation मध्ये career संधी.

Animation मध्ये career साठी खूप संधी आहेत.

         Graphics designer

         Video gaming

         Advertisement

         Video production house

         Film making & television

         Multimedia

         Architecture planner

 

Animation शिकण्यासाठी लागणार्‍या Skills.

तस पहिलं गेल तर हे सगळ तुमच्या आवडी वर अवलंबून आहे.

1] निरिक्षण कौशल्ये observation skills चांगलं पाहिजे.

2] तुमच्या मध्ये creativity पाहिजे .

3] तुमच्या मध्ये Drawing /Sketching skills असणे अधिकच चांगलं.

4] सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम आणि एकाग्रता.

5] Computer वर जास्त वेळ काम करण्याची तयारी.

6] सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Team work.

 

Animation Degree /Diploma Course साठी काय पात्रता हव्यात ?

Diploma करण्यासाठी 10 वी ज्या मध्ये 2 वर्ष लागतात आणि degree साठी 12वी ज्या मध्ये 3  वर्षाचा अभ्यासक्रम असतो. टक्केवारी ची अट आणि विद्यार्थी science चा असावा की दुसर्या् stream  चा हे  college/university  वर अवलंबून असते. Private institute मध्ये या अटी खूप शिथिल आहेत पण Fees खूप जास्त असते. जर महाराष्ट्रातील colleges बद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला E-mail करा.


Animation मध्ये salary किती मिळते ?

 Animation सध्या खूप demand मध्ये आहे. मोठ मोठ्या Production House मध्ये 20000-25000 रु. पासून सुरवात आहे. जस जसे तुमचे कौशल्य आणि अनुभव वाढेल तसे चांगली बढती आणि पगार मिळू शकतो ज्यामध्ये आपला पगार रु. 35,000 ते 40,000 रु. पर्यंत काही वर्षामध्ये जातो.

Animation काय आहे व ते कसे बनवतात ? आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे अशी आपली इच्छा असल्यास, यासाठी आपण खाली comments लिहू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. खूपच छान । अतिशय उपयुक्त मोलाची माहिती मला या लेखातून मिळाली आहे

    उत्तर द्याहटवा
  2. Nice blog!
    We our the top in fashion, animation & beauty education industry and now we distribute our franchise all over India…
    Animation & VFX Degree Course
    Mobile: 9501489999

    उत्तर द्याहटवा